माणसांची लक्तरे आणि लक्तरांचे वेश
माणसांची लक्तरे आणि
लक्तरांचे वेश…
गांधी, विवेकानंद पुजत आले
तो हाच का
हो आपला देश?
निधड्या छातीचे लोक
खडकावर घाव घालू
पाहतात,
जातिवंत सांड शिट्ट्या
हाणून राव बनू
पाहतात.
अखेर भरले
त्यांचे दिवस आणि
निघून गेले ते
लोक,
ओढवून घेतलेलं हे
दुखणं, कशाला करता शोक?
आसवे गळाली
खरोखर ज्यांची अजूनही
चालले सत्याची वाट
धरून,
बडवली छाती बडवायची
त्यांनी आन झोळ्या
घेतल्या भरून.
"काळा" दिवस विझला
आणि दिवे टाकले
मालवून,
काय केल
आपण खरं, एवढे
शूर घालवून?
अखेर अंधारातच
वीणाल जाळे, जे
असेल अंधारावरूनही काळे।
वाट नसेल
तिथे व्यक्त व्हायला,
कुढून-गोठून अशक्त
व्हायला
अखेर उरतील
माणसांची लक्तरे आणि लक्तरांचे
वेश।
गांधी, विवेकानंद पुजत
आले तो हाच
का आपला देश?
- ©रितेश रणधीर
20/08/2013
भावपूर्ण श्रद्धांजली, नरेंद्रजी दाभोळकर!!
भावपूर्ण श्रद्धांजली, नरेंद्रजी दाभोळकर!!
